शिरपूरात गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या


A Young Man Committed Suicide By Firing a bullet From a Gavathi Katta in Shirpur शिरपूर :  शिरपूरात गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हर्षल भिका माळी (24, रामसिंग नगर, शिरपूर) असे मयताचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली ? याबाबतचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

आधी लग्नाचे आमिष नंतर नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

गोळी झाडत केली आत्महत्या
रामसिंग नगरातील हर्षल भिका माळी (24) या तरुणाने बुधवारी रात्री 11 वाजता स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली व अत्यवस्थ अवस्थेत तयास उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्यातून रक्त प्रवाह अधिक होत असल्यामुळे रुग्णालयातील डॉ.कदम यांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवले मात्र गुरुवारी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


खुनाच्या गुन्ह्यात पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !