शिंदे सरकारने बदलला आधीच्या सरकारचा निर्णय : नगराध्यक्षांसह सरपंचांची आता जनतेतून होणार निवड
The Shinde government changed the decision of the previous government : the mayor and the sarpanch will now be elected by the people मुंबई : राज्यातील शिंदे सरकार जनतेतून नगराध्यक्ष निवडीबाबत सकारात्मक विचार करीत असतानाच आजच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. आता नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट नागरीकांमधून निवडून येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांनी केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा निर्णय या सरकारने बदलला आहे. भाजपादेखील थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीबाबत अनुकूल असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
तत्कालीन आघाडी सरकारने बदलला होता निर्णय
फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून येतील, असा निर्णय घेतला होता मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून आधीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडून जातील असा निर्णय घेतला. राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदांची निवड होईल, असे मानले जात होते. यावर गुरुवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले

थेट आता जनतेला मिळणार अधिकार
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांनी यापुढील निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून येणार असल्याचे जाहीर केले. यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकर्यांना आता थेट मतदान करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे नगरपालिकांमधील समीकरणे पूर्णपणे बदलणार असून निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यताही आहे.