Petrol 5 Rupees And Diesel 3 Rupees Cheaper राज्यातील नागरीकांना मोठा दिलासा : पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त
A Big Relief For The Citizens of The State : Petrol 5 rupees And Diesel 3 rupees Cheaper मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने इंधन दरवाढीने त्रस्त नागरीकांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधी मंडळात जाहीर केल्यानंतर गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीत पेट्रोल हे प्रतिलिटर पाच तर डिझेल हे प्रति लिटर 3 रुपयांची कपात करण्याचा निर्णय झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सलग चौथ्यांदा गिरणा धरण शंभर टक्के भरण्याची आशा ! आज दुपारपर्यंत होणार 80 टक्के जिवंत साठा
घोषणा ठरवली सार्थ
राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shide)आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव पारीत करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात इंधनावरील दर कमी करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्री मंडळाच्या बैठकीत पारीत होणे गरजेचे होते. गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कॅबिनेट बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आली. याबाबतची माहिती आज एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परीषदेत दिली.

लोकोपयोगी निर्णय : फडणवीस
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या बैठकीत काही लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देणार असल्याचे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide)म्हणाले की, सध्या इंधनाच्या दरात मोठी वाढ होत आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केली होती. याप्रसंगी पंतप्रधानांनी राज्य शासनालाही असे करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्य सरकारने कर कमी केले नव्हते मात्र आम्ही हे कर कमी करण्याचे जाहीर केले होते. तर आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत इंधनावरील व्हॅट कमी करण्यात आले. यामुळे पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी कमी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
शिंदे सरकारने बदलला आधीच्या सरकारचा निर्णय : नगराध्यक्षांसह सरपंचांची आता जनतेतून होणार निवड
मंत्रि मंडळ बैठकीतील निर्णय
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान राबविण्यात येणार.
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबविणार
नगरपरीषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा.
बाजार समितीतील सर्व शेतकर्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा.
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
आधी लग्नाचे आमिष नंतर नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या