Heavy Rains Continue: ‘Mangalur Dam’ Overflows in Rawer Taluka मुसळधार पाऊस कायम : रावेर तालुक्यातील ‘मंगळुर धरण’ ओव्हर फ्लो
Heavy Rains Continue: ‘Mangalur Dam’ Overflows in Rawer Taluka रावेर : रावेर तालुक्यात बुधवापासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळुर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. बुधवारी रात्री दोन वाजता हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून पातळीपेक्षा दहा सेंटीमीटरवरुन पाण्याचा विसर्ग होत आहे.
रब्बी पिकांना मोठा फायदा
रावेर तालुक्यात बुधवारपासून हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडत होता तर दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री तीन वाजेपासून संततधार पाऊस सुरू असल्याने मंगळुर1 धरण ओसंडून वाहत आहे. पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. रावेर तालुक्यात पहिलाच दमदार पाऊस कोसळत असल्याने या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. रावेर तालुक्यातील धरणाच्या पाणी पातळीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.
