तत्कालीन ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला : शिंदे सरकारने औरंगाबादसह उस्मानादच्या नामांतराला दिली स्थगिती


The decision of the then Thackeray government was reversed: The Shinde government put a stay on the renaming of Aurangabad along with Osmanad मुंबई  : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना शिंदे सरकारकडून स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव तसेच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या कारणास्तव दिली निर्णयांना स्थगिती
राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर सरकारला कॅबिनेट बैठक घेता येत नाही, असे असतानाही ठाकरे सरकारनं बैठक घेतली आणि लोकप्रिय निर्णय घेतले. यावर आक्षेप घेत ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच याबाबतचे सूतोवाच केले होते. दरम्यान, हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


तत्कालीन ठाकरे सरकारला मोठा धक्का
ठाकरे सरकार कोसळण्याआधी 29 जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता.

अधिकाराचा सचिवाने उचलला गैरफायदा : बनावट स्वाक्षरीद्वारे डेअरी मालकाला लाखाचा गंडा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !