Elections of eight thousand cooperative societies in the state postponed till September 30 मोठी बातमी : राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर
Big news : Elections of eight thousand cooperative societies in the state postponed till September 30 मुंबई : राज्यातील 92 नगरपरीषद व चार नगरपरीषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता राज्यातील पावसाची स्थिती पाहता सहकार विभागाने सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकाही 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
लोहार्याच्या विवाहित तरुणीची आत्महत्या : तक्रारीनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन
राज्यातील पूर स्थितीमुळे निर्णय
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असून, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 13 जुलै 2022 रोजीच्या अहवालानुसार, राज्यातील पूरस्थितीमुळे 1 ते 12 जुलै या कालावधीत 89 व्यक्ती आणि 181 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

जनजीवनावर पावसाचा परीणाम
राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली 249 गावे, तर एकंदरीत 1368 घरांची पडझड झालेली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या
पावसाची परीस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 25 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असे सहकार विभागाने आपल्या आदेशात नमूद केलेले आहे.