Jagan Sonawane जळगाव जिल्ह्यातील पालिका निवडणुका रीपब्लिकन पक्षांना एकत्र करून निवडणुका लढणार

जगन सोनवणे : जळगाव जिल्ह्यातील सर्वच पालिकांमध्ये उमेदवार उभे करणार : शहर विकासासाठी नवीन चेहर्‍यांना संधी


भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व रीपब्लिकन गटांना एकत्र करून आघाडीच्या माध्यमातून आम्ही मैदानात ताकदीनिशी उतरणार असून शहर विकासासाठी नवीन चेहर्‍यांना संधी देवून कायापालट करू, असा विश्वास कामगार नेते, पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष, संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे शहरात आयोजित पत्रकार परीषदेत व्यक्त केला. भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत बदल घडणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकत्रीतरीत्या लढणार निवडणुका
शासकीय विश्रामगृहात गुरुवारी झालेल्या पत्रकार परीषदेत कामगार नेते जगन सोनवणे म्हणाले की, भुसावळसह जळगाव जिल्ह्यात ज्या पालिकेत निवडणुका होतील तेथे संविधान जनसेवा आघाडी (सजा) च्या माध्यमातून निवडणुका लढवण्यात येतील शिवाय रीपब्लिकन पक्षांना एकत्र करून निवडणुका लढवण्यात येतील, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात संबंधिताशी बोलणी सुरू असून तसे पत्रदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सोबत यावे म्हणून काही लोकप्रतिनिधींनी संपर्क साधल्याची माहिती सोनवणे यांनी देत आम्ही संविधान जनसेवा आघाडीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नवीन चेहर्‍यांना संधी : शहर विकास ध्यास
संविधान जनसेवा आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत आम्ही नवीन चेहर्‍यांना संधी देणार आहोत. शहरासह प्रभागाचा विकास हाच आमच्या उमेदवारांचा ध्यास असेल. बेरोजगारांना रोजगार, 24 तास पाणी, सिमेंटचे रस्ते देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करीत सर्व शाळांचे आधुनिकीकरण, सर्व अतिक्रमण धारकांना घरकुल आणि टपरी धारकांना जागा देवू, असा जाहीरनामा असल्याचे सोनवणे यांनी प्रसंगी सांगितले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे, राकेश बग्गन, आरीफ शेख, गोपी साळी, बिलाल भाई, बाबू शहा, यादव, एकनाथ पाटील, संघपाल किर्तीकर आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !