साडेसहा लाखांचा ऐवज असलेली पर्स कुर्ला एक्स्प्रेसमधून लांबवली

भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा : प्रवासी झोपल्याची साधली संधी


भुसावळ : प्रवासी गाढ झोपेत असल्याची संधी चोरट्यांनी साधत 12168 वाराणसी-कुर्ला एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ हद्दीत चोरी झाल्याने भुसावळ लोहमार्ग पोलिसात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

लखाळे हादरले : स्वयंपाक न केल्याने पत्नीचाच केला खून

प्रवासी झोपताच लांबवली पर्स
व्यवसायाने सीए असलेले सुजीतकुमार ओमप्रकाश उपाध्याय (33, रावळपाडा, दहिसर, मुंबई) हे पत्नी, मुले व बहिणीसह 6 जुलै रोजी अप 12168 वाराणसी-मुंबई एक्स्प्रेसच्या कोच बी-4 बर्थ क्रमांक 10, 11 व 15 वरून प्रवास करीत असताना खंडवा-भुसावळ दरम्यान उपाध्याय परीवारातील सदस्यांना झोप लागल्याची संधी चोरट्यांनी साधत उपाध्याय यांच्या पत्नीची पर्स लांबवली. या पर्समध्ये 30 ग्रॅमचे मंगळसूत्र, 35 ग्रॅमच्या सोन्याच्या तीन चैन, 25 ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, 20 ग्रॅमची कर्णफुले, तीन ग्रॅमचे सोन्याचे पँडल व तीन हजार 500 रुपयांची रोकड मिळून सहा लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. उपाध्याय यांनी कुर्ला लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


जळगाव जिल्ह्यातील पालिका निवडणुका रीपब्लिकन पक्षांना एकत्र करून निवडणुका लढणार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !