शिंदे सरकारची मोठी घोषणा : औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामकरण


Shinde government’s big announcement: Aurangabad has been renamed Chhatrapati Sambhajinagar and Osmanabad has been renamed as Dharashiv मुंबई : तत्कालीन आघाडी सरकारने दोन शहरांचे नामांतरण केले असलेतरी हा निर्णय सरकार अल्पमतात असल्याने अडचणीचा ठरला असता म्हणून विद्यमान शिंदे सरकारने हा निर्णय रद्द करीत शनिवार, 16 रोजी घेतलेल्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दिबा पाटील देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर मावळत्या सरकारचे जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाही तर उगवत्या सुर्याप्रमाणे जबाबदारी घेऊन निर्णय घेण्यात आल्याचा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

बेवारस बॅग भुसावळ स्थानकाबाहेर ठेवून चार तास यंत्रणा वेठीला : युपीतील प्रवाशावर दंडात्मक कारवाई

नामांतर निर्णयावर शिक्कामोर्तब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्य मंत्री मंडळाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील, नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे तसेच पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.




आम्ही दिलेला शब्द पाळला : मुख्यमंत्री
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर कऱण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. त्यांनी उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाबाबतही घेतला होता. पण सरकार अल्पमतात असल्यामुळे या निर्णयाला कुणी आव्हान दिले असते तर अडचणीचे ठरले असते म्हणून निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज आम्ही दिलेल्या शब्दांप्रमाणे तिन्ही निर्णय घेतले आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. नामांतराबाबत विधीमंडळात ठराव करुन त्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असे ते म्हणाले.

रावेरातील दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : दोघा विस्तार अधिकार्‍यांना अथक










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !