दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : रावेरातील 12 आरोपींना 20 पर्यंत पोलिस कोठडी
1.5 crore corruption case: 12 accused in Ravera remanded to 20 police custody रावेर : राज्यात गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय अपहार प्रकरण शुक्रवारी रात्री दोन विस्तार अधिकार्यांना बेड्या ठोकल्याने भ्रष्टाचार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपींची संख्या आता 12 झाली आहे. दरम्यान, अटकेतील सर्व आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शिंदे सरकारची मोठी घोषणा : औरंगाबादचे झाले छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामकरण
अधिकार्यांची भूमिका संशयास्पद
ग्रामीण जनतेला तालुकास्तरावरुन शौचालय योजनेचे अनुदान वर्ग करण्यात गट समन्वयक समाधान निंभोरे, समूह समन्वयक मंजुश्री पवार तसेच ग्राम पंचायत तत्कालीन विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे व दीपक संदाशु तसेच लेखाधिकारी लक्ष्मण पाटील व शेवटी गट विकास अधिकारी या सर्वांची अनुदान वर्ग करण्यात महत्वाची भूमिका होती. संपूर्ण राज्यात शौचालय योजनेचा भ्रष्ट्राचार गाजत असून या संपूर्ण गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत. पोलिस प्रशासनाच्या या संपूर्ण कारवाईवर जिल्ह्यातील जनतेच्या नजरा आहेत

पोलिसात तपासात अनेक घडामोडी
आतापर्यंत भ्रष्ट्राचार प्रकरणात गट समन्वयक समाधान निंभोरे यांना अटक करण्यात आली असून समूह समन्वयक मंजुश्री पवार पसार आहे. लेखाधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह तत्कालीन सेवानिवृत्त ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे व सध्या रावेर पंचायत समितीत ग्राम पंचायतचे विस्तार अधिकार दीपपक संदाशु यांना शुक्रवाी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी आठ पंटरदेखील कायद्याच्या कोठडीत आहेत. निष्काळजीपणा करून पंचायत समितीमधील अनुदान टाकणारी सिस्टीम व अनुदानाचा वारंवार लाभ घेणारी लाभार्थी दोघ बाजूने अटकसत्र राबविले जात आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
28 खेड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा : हुतात्मा एक्स्प्रेसला आता कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा

