वरणगाव नगरपरीषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार : नवलसिंग पाटील

विकासकामांच्या जोरावर भाजपाची येणार सत्ता असल्याचा व्यक्त केला आशावाद : पदाधिकार्‍यांची निवड


BJP flag will be hoisted on Warangaon Municipal Council : NavalSingh Patil भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे भारतीय जनता पार्टी शहरची बैठक नुकतीच निवडणूक प्रभारी जिल्हा चिटणीस नवलसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रसंगी वरणगाव शहरातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी नगरपरीषद निवडणुकीत भाजपाने केलेल्या विकासाच्या जोरावर भाजपाची सत्ता येईल, असा, आशावाद पाटील यांनी व्यक्त करीत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. प्रसंगी आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढेल, असेही त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुका सरचिटणीस दिलीप कोळी, गोलू झाल्टे, हाजी अल्लाद्दीन सेठ, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील माळी, अजय पाटील, शामराव धनगर, सुभाष वाघ, प्रणिता पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाले, मिलिंद भैसे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख आदींची उपस्थिती होती. प्रसंगी शेख मुस्लिम अन्सारी यांची तालुका सरचिटणीसपदी तर तालुका उपाध्यक्षपदी शेख निजाम, अलीम भाई यांची निवड जाहीर करण्यात आली.


राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव
बैठकीत राज्यातील सरकारने पेट्रोल पाच तर डिझेल तीन रुपये कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष व सरपंच करण्याच्या निर्णयाचे व राज्यातल्या ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव शहर भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी हात वर उंच करून भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन ठराव संमत केला.

यांनी घेतले यशस्वीतेसाठी परीश्रम
बैठक यशस्वीतेसाठी आकाश निमकर, भाजयुमो शहराध्यक्ष डी.के.खाटीक, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी मनीषा पाटील, तालुकाध्यक्ष रुख्मिणी काळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संगीता माळी, निता तायडे, डॉ.नानाभाऊ चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, पप्पू ठाकरे, संतोष कश्यप, नाना चौधरी, सरचिटणीस योगेश माळी, कुंदन माळी, नटराज चौधरी, रामभाऊ माळी , ज्ञानेश्वर घाटोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !