केर्हाळा येथील एकाची विष प्राशनाने आत्महत्या
A person in Kerala commits suicide by consuming poison रावेर : केर्हाळा येथील एकाची विष प्राशनाने आत्महत्या तालुक्यातील केर्हाळा येथील ज्ञानेश्वर सीताराम पाटील (50) काही तरी विषारी द्रव सेवन केल्याने 16 जून 2022 रोजी त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना 21 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद जिल्हा रुग्णालयातून रावेर पोलिसांना प्राप्त झाल्याने शुक्रवार, 15 रोजी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक सुनील वंजारी करीत आहेत.