गिरणा पात्रात बुडाल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू
A 16-Year-Old Boy Died After Drowning In a Mill Vessel जळगाव : जळगाव शहरातील 13 वर्षीय बालकाचा भोकनी शिवारातील गिरणा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. गही घटना शनिवारी घडली. रविवारी सकाळी बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल हिलाल जोहरे (16) असे मयताचे नाव आहे.
तिघे बचावले मात्र एकाचा मृत्यू
शिवाजी नगरातील यश पप्पू भालेराव (14), प्रेम परशुराम झांझळ (15), मयूर संतोष सपकाळे (15) व विशाल हिलाल जोहरे (16) असे चौघे शनिवार, 16 जुलै रोजी भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले असता सर्वजण पाण्याचा अंदाज न बुडू लागले. हा प्रकार नदीकाठी असलेल्या काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी यश, परशुराम व प्रेम यांना पाण्यातून बाहेर काढले पण विशाल मात्र बाहेर निघु शकला नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो गाळात, डोहात अडकला. रात्री उशीरापर्यंत मृतदेह शोधण्यास यश आले नाही. रविवार, 17 जुलै रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे, पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत मुलगा हा नुतन मराठा शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई अनिता, वडील हिरालाल सुरेश जोहरे, मोठे भाऊ बबलू आणि सोनू , एक विवाहित बहिण असा परीवार आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी यावेळी मोठा आक्रोश केला. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पिंप्री येथील वृद्धाची आत्महत्या