यावल शहरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
A 30-year-old youth hanged himself when no one was at home: Incidents in this city यावल : शहरातील शिवाजी नगर परीसरातील 30 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही याबाबत यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सागर बापू पाटील (30, शिवाजी नगर, यावल) असे मयताचे नाव आहे.
मृतदेह पाहताच कुटुंबियांनी फोडला हंबरा
सागर पाटील हा तरुण यावल शहरातील बसस्थानजवळील एका बॅटरीच्या दुकानावर कामास होता. रविवारी मी घरून जेवण करून येतो, असे तो दुकान मालकास सांगून गेला होता मात्र घरात कुणी नसतांना घरातील छताला दोरी बांधून तरुणाने गळफास घेतला. शेतातून दुपारी घरी पत्नी आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी हंबरडा फोडला. परीसरातील राहणार्या तरूणांनी धाव घेवून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले.मयत सागर याच्या पश्चात पत्नी आणि एक चार वर्षांचा मुलगा आहे.
