जळगावातील 22 वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज पाठवून मागितली खंडणी


A 22-year-old girl from Jalgaon was sent an obscene message and asked for Ransom जळगाव : शहरातील 22 वर्षीय तरूणाला अज्ञाताने व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल मॅसेज पाठवून खंडणी मागितली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इतरांसोबतचे तरुणीचे फोटो पाठवत मागितली खंडणी
जळगाव शहरातील एका भागात 22 वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करते. शुक्रवार, 8 जुलै ते शनिवार, 16 जुलैच्या कालावधीत तरूणीला तिच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने तिचे फोटो सोबत इतरांचे अश्लिल फोटो पाठविले. त्यानंतर सदरील फोटो सोशल मीडीयात व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणीची मागणी केली. दरम्यान, अनोळी व्यक्तीने तिचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल करून तिची बदनामी केली असून तरुणीने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर शनिवार, 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


पतसंस्थेच्या वसुली अधिकार्‍याने कर्जदाराचे प्लॉट परस्पर विकले : भुसावळातील 11 जणांविरोधात गुन्हा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !