रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या अध्यक्षपदी प्रसन्न पांडे
सचिवपदी सागर विसपुते : नवीन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सचा पदग्रहण समारंभ रोटरी हॉलमध्ये झाला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे आणि सचिव म्हणून सागर विसपुते यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण समारंभाला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील आणि रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सासरच्या छळाला कंटाळून कुर्हेपानाचे गावातील विवाहितेची आत्महत्या : एस.टी.चालक पतीला अटक
नूतन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे यांनी मावळते अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच मावळते सचिव अॅड. विनोद तायडे यांनी नवनिर्वाचित सचिव सागर विसपुते यांना सचिवपदाची सूत्रे सोपवली. मावळते अध्यक्ष राजेंद्र यावलकर मागील वर्षात राबविलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती देत केलेल्या कामाचा आढावा दिला. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसन्न पांडे यांनी होय ‘आम्ही रक्तादूत’ या रक्तदान संबंधी उपक्रमाची सुरुवात केली तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण असे विविध उपक्रम घेणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे राजीव शर्मा यांनी रोटरीबाबत मोठी स्वप्न बाळगा व रोटरीच्या माध्यमातुन आपले नाव मोठे करा, असा संदेश सर्व रोटरी सदस्यांना दिला. पदग्रहण सोहळ्यात एकूण 12 नागरीकांनी रोटरी रॉयल्सचे सदस्यत्व स्वीकारले. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक कार्यक्रमास उपस्थित होते.
