इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसमचे पदग्रहण उत्साहात


भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लोसमचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. माजी अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी नूतन अध्यक्ष रीतीका हेडा यांना अध्यक्षपदाची तर सेक्रेटरी म्हणून निलीमा निकम यांना सूत्रे सोपवली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए.प्रा.दिनेश राठी, प्रा.रश्मी शर्मा, शीतल भराडिया यांची उपस्थिती होती.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
माहेश्वरी समाज अध्यक्ष रामवल्लभ झंवर, शुभांगी हेडा, शामलता लढ्ढा, राजश्री लढ्ढा, रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष प्रसन्न पांडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुचिका शर्मा, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषी शुक्ला, प्रकाश ठाकूर, जेसीआयच्या अध्यक्षा ज्योती दरगड, सचिव निशा मंडलेचा, आयडब्लूसी खरगोनच्या स्मिता बियाणी तर इनरव्हील ब्लोसमच्या सदस्य श्वेता लढा, करुणा हेडा, राखी भराडीया, अमृता बजाज, सिद्धी तिवारी, मोहिनी महाजन, मुस्कान मोटवानी, डॉ.छाया देशमुख, शिल्पा झंवर, ममता ठाकूर, ईशा मनवानी, दीपा पटेल, संजीवनी लाहोटी, पल्लवी सोनार आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सिद्दी तिवारी तर आभार उपाध्यक्ष राखी भराडीया यांनी मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !