परप्रांतीय मोबाईल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : शहरातील गांधी नगरासह प्रल्हाद नगरात परप्रांतीय चोरट्यांनी भीक मागण्याच्या बहाण्याने दोन नागरीकांच्या घरातून 28 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल लांबवले होते. बाजारपेठ पोलिसांना याबाबतची माहिती कळताच गस्ती पथकाने बसस्थानक भागातून दोघांच्या मुसक्या आवळल्या. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.

परप्रांतीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळातील गांधी नगर भागातील सौरभ अशोक मोरे (25) व प्रल्हाद नगरातील प्रतीक कुलकर्णी यांच्याकडे सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महिलासह पुरूषाने भीक मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करीत मोरे यांच्या घरातून तीन तर कुलकर्णी यांच्या घरातून एक मोबाईल लांबवला. याबाबत तक्रारदाराने संशयीताचे वर्णन बाजारपेठ पोलिसांना कळवताच बाजारपेठ पोलिसांनी बसस्थानक भागातून संशयीत रामपती जोगींदर मोदी (35, ईटारसी, मध्यप्रदेश) व दिव्या लालू मोदी (19, झारखंड) यांना ताब्यात घेतले. संशयीतांच्या ताब्यातून 28 हजार रुपये किंमतीचे चार चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी सौरभ मोरे यांच्या फिर्यादीनुसार वरील दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !