जळगावातील दाम्पत्याला ट्रॅव्हल्स खरेदी व्यवहारात 15 लाखात फसवले : चौकडीविरोधात गुन्हा


Jalgaon couple cheated of 15 lakhs in travel purchase transaction: Crime against foursome जळगाव : गुजरात राज्यातून खरेदी केलेल्या ट्रॅव्हल्सच्या व्यवहारात एका दाम्पत्याची 15 लाख 27 हजार 167 रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संततधार पावसाने नागझिरी नदीला पूर : रावेरात घरांमध्ये शिरले पाणी

फसवणूक प्रकरणी न्यायालयात धाव
राजेश मेहता व त्यांच्या पत्नी शिला (रा. गुड्डुराजानगर) या दाम्पत्याची फसवणूक झाली आहे. फाल्कन बस लाईन प्रा. लि. चे संचालक हार्दीक इंदरकुमार कोटक, जयश्री इंदुभाई कोटक, मित्तल हार्दीक कोटक, इंदरकुमार कांतीलाल कोटक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चौघांविरोधात गुन्हा दाखल
मेहता दाम्पत्याने प्रवासी वाहतूक करण्यासाठी वातानुकुलीत खाजगी ट्रॅव्हल्स खरेदीसाठी फाल्कन कंपनीशी संपर्क केला होता. 23 सप्टेबर 2018 रोजी त्यांनी कंपनीला दोन लाख रुपयांची रोकड व पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर वेळोवेळी करुन 15 लाख 27 हजार 167 रुपये दिले. कंपनीने त्यांना ट्रॅव्हल्स दिली होती; परंतु, कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स पूर्णपणे मेहता दाम्पत्याच्या नावे झालेली नव्हती. अशात त्या ट्रॅव्हल्सवर व्यवसाय करणे देखील धोकादायक झाले होते. मधल्या काळात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन झाले. यावेळी व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कंपनीने पासिंग, फिटनेस व करार करण्याच्या बहाण्याने मेहता यांच्याकडून ट्रॅव्हल्स मागवून घेतली. त्यानुसार मेहता यांनी 31 ऑक्टोबर 2020 रोजी ट्रॅव्हल्स पाठवून दिली. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आठ दिवसात ट्रॅव्हल्स परत पाठवू असे उत्तर त्यांना देण्यात आले होते; परंतु, दोन महिने झाले तरी ट्रॅव्हल्स पाठवली नाही. या प्रकरणी मेहता यांनी थेट न्यायालयात धाव घेेतली. सुनावणीअंती न्यायालयाने संबधित कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

इंदौर-अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळून अपघात : मृतांवर आज होणार अंत्यसंस्कार : राज्य शासनातर्फे दहा लाखांची मदत


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !