Erandol Accident भालगावच्या प्रौढाचा एरंडोल येथे अपघाती मृत्यू


Accidental death of Bhalgaon adult at Erandol एरंडोल : भालगावच्या प्रौढाचा एरंडोल येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास महामार्गावर ही घटना घडली. सुनील भास्कर शिंदे (वय 44) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आपल्या बाळंत झालेल्या मुलीला येथील ग्रामीण रुग्णालयात जेवणाचा डबा पोहोचवण्यास जात असताना हा अपघात झाला.

इंदौर-अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळून अपघात : मृतांवर आज होणार अंत्यसंस्कार : राज्य शासनातर्फे दहा लाखांची मदत

ग्रामीण रुग्णालयात जात असताना अज्ञात वाहनाची धडक
सुनील शिंदे हे तालुक्यातील भालगाव येथे कुटुंबासह राहतात. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांची मुलगी जयश्री सागर धिवरे ही बाळंत झाली आहे. तिला घरून जेवणाचा डबा देण्यासाठी शिंदे ग्रामीण रुग्णालयात चालत जात होते. पाऊस सुरू असल्याने रस्त्याच्या कडेने चालत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे ते जागीच ठार झाले. मृताची ओळख पटत नव्हती. शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यानंतर त्यांची ओळख पटली.


एरंडोल पोलिसांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी तत्काळ बीट हवालदार विकास देशमुख, अनंत पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने चेंदामेंदा झालेला मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. पोलिस ठाण्यात ईश्वर शिंदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मृत शिंदेंची परीस्थिती बिकट असल्याने भालगावहून पाच कि.मी. लांब ग्रामीण रुग्णालयात पायी येत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, जावई असा परीवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

जळगावातील दाम्पत्याला ट्रॅव्हल्स खरेदी व्यवहारात 15 लाखात फसवले : चौकडीविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !