यावल शिवारातील मंदिराची दानपेटी फोडली
यावल : यावल शिवारातील गट क्रमांक 1754 मध्ये असलेल्या श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ध्यान मंदिरात चोरट्यांनी शिरकाव करीत मंदिराच्या आवारात दानपेटी फोडून साडेचार हजारांची चिल्लर लांबवल्याची धक्कादायक बाब सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भालगावच्या प्रौढाचा एरंडोल येथे अपघाती मृत्यू
चोरट्यांचा मोर्चा मंदिरांच्या दानपेट्यांकडे
यावल शिवारात श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ध्यान मंदिर असून या ठिकाणी अनेक भाविक मोठ्या संख्येने येतात. चेतन देविदास निगडे (37, विठ्ठलवाडी, कोर्टाजवळ, यावल) हा तरुण दररोज सकाळी आणि संध्याकाळी मंदीरातील साफसफाई करून पूजापाठ करतो. सोमवार, 18 जुलै रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेच्या कालावधीत मंदिरात कुणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तोडून चार हजार 500 रुपयांची चिल्लर चोरून नेली. या प्रकरणी चेतन निगडे याने यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.
