तरुणीची आत्महत्या : आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा
Inducing young woman to commit suicide: Crime against ‘that’ lover जळगाव : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकराविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल, तुझे दुसरीकडे लग्न होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याने जळगावातील दिव्या दिलीप जाधव (21, गेंदालाल मिल, जळगाव) या तरुणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी निलेश मंगलसिंग गायकवाड (तारखेडा खुर्द, ता.पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
उपचार सुरू असताना तरुणीचा मृत्यू
शहरातील गेंदालाल मिल परीसरात राधाबाई दिलीप जाधव या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. 24 जून रोजी दुपारी तीन वाजता त्या कामावर असतांना त्यांना प्रकाश कापसे यांनी फोन करून तुम्ही ऑर्कीड हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार राधबाई या हॉस्पिटलमध्ये गेल्या असता, त्यांना आपली मुलगी दिव्या हीने गळफास घेतल्याचे समजले. या ठिकाणावरील व्हेंटीलेटर सुविधा नसल्याने तीला दुसर्या खासगी रुग्णालयता दाखल केले परंतु दिव्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यानंत उपचार सुरु असतांना 13 जुलै रोजी तीची प्राणज्योत मालवली होती.

लग्नाविषयी बोलल्याने केले अपमानित
राधाबाई यांची चुलत नणंद लक्ष्मीबाई यांचा मुलगा निलेश गायकवाड याच्यासोबत दिव्या दोन वर्षांपासून बोलत होती. निलेश नात्यातीलच असल्याने दिव्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत निलेशच्या घरी लग्नाविषयी बोलणी करण्यास गेले होते. परंतु निलेशच्या आईने तुमच औकात आहे का? आमच्या घरात मुलगी देण्याची असे बोलल्याने जाधव कुटुंबिय त्याठिकाणाहून निघून आले होते. गायकवाड यांन अपमानित केल्यानंतर देखील दिव्या व निलेश हे दोघ फोनवर बोलत होते. यावेळी राधाबाई यांनी निलेशला माझ्या मुलीला फोन करु नको असे सांगितले. तसेच तिच्यासाठी मुलगा देखील पसंत केला होता. व त्याला बघण्यासाठी 26 जून रोजी जाधव कुटुंबिय मुलाकडे जाणार होते. परंतु त्यापुर्वीच दिव्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.