हळद कार्यक्रमाहून परतणार्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवले : दुचाकीस्वार ठार तर दुसरा मित्र जखमी
Bike Rider Killed in Jalgaon Collision With Unknown Vehicle ; Second Serious जळगाव : जळगावातील तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने मृत्यू झाला. या प्रकरणी सोमवार, 18 जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निखील उर्फ अश्विन गोकुळे सोनवणे (22, रा. हरीओम नगर, जळगाव) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. या अपघातात गणेश भावलाल कोळी हा गंभीर जखमी झाला. दोन्ही मित्र मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडला.
फुलगाव ओव्हर ब्रिज जवळील अपूर्ण कामांच्या निषेधार्थ 21 रोजी रास्ता रोको
अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात
निखील उर्फ अश्विन सोनवणे हा तरुण आसोदा रोडवरील हरीओम नगरात वास्तव्याला होता. 7 जुलै रोजी निखील व त्याचा मित्र गणेश भावलाल कोळी (रा.आसोदा रोड, जळगाव) हे मित्राच्या भावाच्या हळदीचा कार्यक्रमासाठी कुसुंबा येथे दुचाकी (एम.एच.19 डी.जे.8841) ने रात्री गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर निखील आणि गणेश हे दोघे दुचाकीने घरी येण्यासाठी रात्री 12 वाजता कुसुंबा येथून निघाल्यानंतर रेमंड चौफुलीजवळून जात असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून येवून जोरदार धडक दिली. या अपघातात निखील सोनवणे हा ठार झाला तर गणेश कोळी हा गंभीर जखमी झाला होता.

11 दिवसानंतर गुन्हा दाखल
अपघाताच्या 11 दिवसानंतर निखीलचे नातेवाईक रतीलाल संतोष सोनवणे (रा. हरीओम नगर, आसोदा रोड, जळगाव) यांनी सोमवार, 18 जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.