अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंचोलीचा युवक जागीच ठार


A youth of Chincholi was killed on the spot in a collision with an unknown vehicle यावल : किनगाव-चिंचोली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंचोलीचा युवक जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला. पांडुरंग सुखदेव मिस्तरी (30, रा.चिंचोली) असे मयताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर किनगाव व चिंचोली हे गाव आहे. या दोन्ही गावातच्या दरम्यानच्या रस्त्यावरून किनगाव येथे मिस्त्री काम आटोपून चिंचोली येथील रहिवासी पांडुरंग सुखदेव मिस्तरी (30, चिंचोली) हा दुचाकी (क्रमांक एम.एच.39 बी.3139) द्वारे आपल्या घरी जात असताना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पांडुरंग मिस्त्री हा जागीच ठार झाला.


अनेकांनी घेतली धाव
अपघाताची माहिती मिळताच किनगावचे सरपंच भूषण पाटील, संजय सयाजीराव पाटील, होमगार्ड संजय साळुंखे, अनिल साळुंखे, रवी चौधरी, किनगाव येथील रवी कोळी हे घटनास्थळावर दाखल झाले. मयत मिस्तरी याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मयत पांडुरंग मिस्तरी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.

चिंचोली गावात खळबळ
तो किनगाव येथे मिस्तरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे चिंचोली गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पुढील कारवाई यावल पोलीस करीत आहे.

हळद कार्यक्रमाहून परतणार्‍या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवले : दुचाकीस्वार ठार तर दुसरा मित्र जखमी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !