Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey finally arrested by ED मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अखेर अटक
Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey finally arrested by ED मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. संजय पांडे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीदेखील हा धक्का मानला जात आहे.
एनएसई घोटाळ्याप्रकरणी कारवाई
एनएसई घोटाळाप्रकरणी कंपनीचे टॉप मॅनेजमेंटमधील अधिकारी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि आनंद्र सुब्रमण्यम यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने 91 कर्मचार्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या कंपनीला चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने 4 कोटी 45 लाख रुपये दिले होते. याशिवाय 20 कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं. याचबाबत ईडीकडून तपास सुरु होता. अखेर याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे.

सकाळपासून सुरू होती चौकशी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. सोमवारी सीबीआयने प्रथम पांडे यांची चौकशी केली होती तर मंगळवारी संजय पांडे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी केली व नंतर पांडे (Sanjay Pandey) यांना अटक करण्यात आली.
ईडीकडून त्या फर्मचीही चौकशी
संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली आहे.