तलाठ्यावर दादागिरी करणारा डॉन अखेर पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : तलाठ्यावर दादागिरी करून वाळू वाहतूक प्रकरणात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यानंतर पसार झालेल्या डॉनच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताला अधिक कारवाईसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोकूळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी (रा.भोलाणे, ता.जळगाव) असे अटक केलेल्या संशयीतोच नाव आहे.

2020 मध्ये दाखल होता गुन्हा
गोकूळ कोळी हा अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळला होता. त्यावेळी त्याने तलाठी यांच्याशी हुज्जत घातली होती. 2020 मध्ये ही घटना घडली व त्यानंतर संशयीत पसार झाला होता. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूकीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गोकूळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना मिळून येत नव्हता.


जैनाबादमधून आवळल्या मुसक्या
गोकूळ उर्फ डॉन याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. गोकूळ हा भोलाणे गावात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्याचा शोध घेतला. त्यानंतर बांभोरी गावातही पथकाने शोधकार्य सुरू केले. शेवटी तो जैनाबाद येथील नातेवाईकांकडे आल्याची माहिती मंगळवारी सकाळी एलसीबीला मिळाली. पथकाने लागलीच जैनाबाद गाठून गोकूळ याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

परप्रांतीय मोबाईल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !