राज्यातील शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार का ; उपमुख्यमंत्र्यांनी केले हे महत्त्वाचे विधान


Will the ministerial board of the Shinde government in the state be expanded; This is an important statement made by the Deputy Chief Minister मुंबई : राज्यातील शिंदे सरकारमधील शपथविधी कधी होणार या प्रश्‍नावर लवकरच मंत्री शपथविधी घेतील, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. अपात्रता प्रकरणी कोर्टातील सुनावणीचा मंत्रीमंडळ विस्ताराशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवरील एकत्रीत सुनावणी बुधवारी सुप्रीम कोर्टात झाली. यानंतर या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.

न्यायालयापुढे प्रभावी युक्तीवाद केला
या अनुषंगाने सदर निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, न्यायालयाच्या निकालाबाबत आजच सांगता येणार नसले तरी आज आम्ही कोर्टासमोर अतिशय प्रभावी युक्तीवाद केला आहे. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केव्हा होणार ? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, अपात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी आणि विस्तार यांचा काही एक संबंध नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसह इतर महत्वाचे प्रश्‍न असल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. तथापि, लवकरच आमचे मंत्री शपथ घेतील, असे फडणवीस म्हणाले.


मोठी बातमी : राज्यात आता ओबीसी आरक्षणासह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !