मंगरूळला बंद घर फोडत 71 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
Thieves broke into Mangrool Bandh house and looted 71 thousand अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 71 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची संधी
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ असलेल्या भिलाटी गावात राहणारे सुनील बापू पवार (23, रा. मंगरूळ, ता.अमळनेर) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 18 जुलै रोजी रात्रीचे जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोट्याने त्यांच्या घरातून 30 हजार रुपयांची रोकड, 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि नऊ हजारांचा मोबाईल असा एकूण 71 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत सुनील पवार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.
