ट्रक अचानक मागे आल्याने मजुराच्या पायाला दुखापत
In Jalgaon, a laborer’s leg was seriously injured due to a sudden reverse of the truck जळगाव : ट्रक चालकाने ट्रक सुरू केल्यानंतर पुढे नेण्याऐवजी रीव्हर्स घेतल्याने मजूराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना एमआयडीसीतील हॉटेल मैत्रेयजवळ घडली आहे. याबाबत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यातील शिंदे सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार का ; उपमुख्यमंत्र्यांनी केले हे महत्त्वाचे विधान
मजुराच्या पायाला गंभीर दुखापत
राजु आंबर्या गवळी (50, देवकीनंदन चाळ, बळीराम पेठ, जळगाव) हे मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 18 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील हॉटेल मैत्रेयच्या मागे एका ठिकाणी काम करत असतांना बाजूला ट्रक (एम.एच.19 जे.0691) उभा होता. ट्रक चालकाने ट्रक सुरू करून पुढे न नेता मागे घेतल्याने राजू गवळी यांच्या दोन्ही पायाला ट्रकचा फालक लागल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवार, 19 जुलै रोजी रात्री 11 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.
