While the attempt to break the ATM in Phagan failed, cash worth five and a half lakhs was looted from Kapdane village फागण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला तर कापडणे गावातून साडेपाच लाखांची रोकड लंपास
While the attempt to break the ATM in Phagan failed, cash worth five and a half lakhs was looted from Kapdane village
धुळे : धुळ्याजवळील फागणे गावाजवळील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन बुधवारी पहाटे अडीच वाजता फोडण्याचा प्रयत्न केला मात्र अलर्ट चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांची चाहूल लागल्याने त्यांनी काढता पाय घेतला मात्र तालुक्यातील कापडणे गावातील सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारत चोरट्यांनी टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडून सुमारे साडेपाच लाखांची रोकड लांबवल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


पोलिस प्रशासनाची धाव
बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह वरीष्ठ अधिकार्यांनी भेट देवून या घटनेची पाहणी केली. तसेच ठसे तज्ञांनी ठसे टिपले आहे. फागणे गावातील एटीएम गॅस कटरने फोडत असताना मशीन तापल्याचा अलर्ट मुंबईतील कार्यालयात मध्यरात्री पोहोचला व यंत्रणेने धुळे तालुका पोलिसांना सूचित केल्याने यंत्रणेने घटनास्थळी धाव घेता अलर्ट चोरट्यांना चाहूल लागल्याने त्यांनी काढता पाय घेतल्याने चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
दोन्ही घटनेत चोरटे एकच असल्याची शक्यता
धुळे जिल्ह्यातील फागणे येथील एचडीएफसी एटीएम मशीन गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र नागरीकांची चाहूल लागल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला मात्र हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे तर त्यानंतर चोरट्यांनी धुळे तालुक्यातील कापडणे गावाकडे मोर्चा वळवला. कापडणे गावातील मुख्य चौकात असलेल्या इंडिकॅश टाटा कंपनीचे एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लांबवण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याची तसेच फारशी वर्दळ नसल्याची माहिती घेवून एटीएम फोडण्यात आल्याने चोरट्यांनी यापूर्वी रेकी केल्याचा अंदाज आहे. शिवाय चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर केल्याने तीन ते चार चोरटे असल्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धत्तीने हरीयाणातील टोळी एटीएम फोडत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला वेग दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोठी बातमी : राज्यात आता ओबीसी आरक्षणासह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका