Jalgaon Again Rrocked By Murder जळगावातील 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या
Jalgaon Again Rrocked By Murder : youth killed by stabbing with a sharp weapon जळगाव : 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह शहरातील शाहू नगर परीसरात आढळला असून पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. भर दिवसा घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रहिम शहा उर्फ रमा (25, रा.गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ : चाळीसगाव तालुक्यातील सहा डॉक्टरांवर कारवाई
अज्ञातांनी केला तरुणाचा खून
शाहू नगर परीसरात असणार्या जळकी मिलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परीसरातील नागरीकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पथक घटनास्थळी धाव घेतली. मयत हा रहिम शहा उर्फ रमा (25, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा असल्याची माहिती समोर आली. बुधवारी दुपारीच कुणीतरी अज्ञात मारेकर्यांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची माहिती आहे.
