An 18-year-old girl from Kusumba village committed suicide by hanging herself कुसुंबा गावातील 18 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या
An 18-year-old girl from Kusumba village committed suicide by hanging herself जळगाव : 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवार, 20 जुलै रोजी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह शहरातील शाहू नगर परीसरातील रेल्वे रूळाजवळ आढळला असून पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. भर दिवसा घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. रहिम शहा उर्फ रमा (25, रा.गेंदालाल मिल, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तीन संशयीतांना अटक करण्यात आली आहे तर मयत मारहाण करून पैसे हिसकावत असल्याने त्यातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.
मोठी बातमी : राज्यात आता ओबीसी आरक्षणासह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
पैसे हिसकावण्याच्या रागातून झाली बाचाबाची
जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथे भोंग्याजवळ रहिम शहा उर्फ रमा मोहम्मद शहा (25) हा कुटुंबासह वास्तव्यास होता. हमाली काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. रहिम शहा हा बुधवार, 20 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही त्याच्या तीन मित्रांसोबत शाहूनगर येथील रेल्वे रुळाजवळ झाडाखाली मद्यप्राशन करण्यासाठी बसला असता रहिम शहा याचा इतरांसोबत वाद झाला. या वादातून त्याच्या सोबतच्या तिघांनी चाकूने रहिम शहा यांच्या छातीवर पोटावर वार करत त्याचा खून केला. खुन केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
खुनाची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. व पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. मयताच्या पश्चात पत्नी फरीनबी, आई रमजाबी मोहम्मद शहा, वडील, तीन मुली असा परीवार आहे. रहिम हा एकुलता एक होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
तीनही संशयीत आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
शहर पोलिसांनी काही तासातच तपास चक्र फिरवून रहिम शहा याचा खून करणार्या तिघांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. पवन किसन लाडे उर्फ देवा (19), मनोज जलाल गायकवाड (42) व विलास तुकाराम निकम (34, तिन्ही रा.गेंदालाल मिल, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. तिघेही संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत रहिम व मारेकरी तिघेही मित्र आहेत. एकाच परीसरात राहतात. रहिम हा शिवीगाळ करून वाद घालत तिघांना मारहाण करायचा व त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्यायचा. यामुळे तिघांमध्ये रहिमविषयी राग होता याच रागातून तिघांनी बुधवारी कटकारस्थान असून रहिमला सोबत घेत मद्य प्राशन केले व त्यानंतर त्याचा खुन केल्याची माहिती मिळाली आहे.