मुख्याधिकारी साहेब, आम्हाला भुसावळातील चिखलमय मार्गातून चालण्याची मुभा द्या

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन


भुसावळ : शहरातील विविध भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसानंतर पायी चालणे बिकट झाले आहे. चिखलमय मार्गातून पायी चालण्याची मुभा द्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.

कुसुंबा गावातील 18 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

शहरातील बहुतांश भागात रस्त्यांची दुरवस्था
भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, पावसानंतर पायी चालणे जिकरीचे झाले असून चिखलमय परीस्थितीत पायी चालतांना पाय घसरून हाडे मोडण्याची भीती निर्माण झाली आहे तातडीने रस्त्यांची डागडुजी करत नागरीकांना दिलासा मिळाला तर भीती कमी होईल. प्रामुख्याने जामनेर रोड वरील भिरुड हॉस्पिटल छटा उत्तरेकडील रस्त्याने थेट सुराणा बिल्डिंग नेब कॉलनी पर्यंत,खूपच विदारक चित्र निर्माण झाले आहे.


नागरीकांना हाडे मोडण्याची भीती
देनानगर मधील काशी विश्वनाथ मंदिर ओरिसा, गणपती मंदिर परीसरात, ज्ञानेश्वर मंदिर परिसर, सोन्या मारोती मंदिर परीसर, मुक्तानंद कॉलोनी,कस्तुरी नगर, सुरभी नगर, साधना नगर, पाटील मळ्याकडे जाणार रस्ता, आर.जी.अग्रवाल यांच्या दवाखान्याकडून टगेत आनंद नगर परिसर,आशा विविध भागात पाऊस पडल्यानंतर खूप गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते शिवाय हाड मोडून दवाखान्यात लाखो रुपयांची बिल भरण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागाचा दौरा मुख्याधिकार्‍यांनी करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

जळगावातील 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !