झेलम एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर पॅन्ट्रीकारमध्ये बलात्कार : आरोपीला पुण्यातून अटक


Rape of minor girl in pantricar in Jhelum Express: Accused arrested from Pune भुसावळ : भोपाळ येथून झेलम एक्सप्रेसने प्रवास करीत असताना एका 14 वर्षीय मुलीवर पॅन्ट्रीकार मधील एका कर्मचार्‍याने अत्याचार केला. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर तपासाची चक्रे वेगात फिरताच यातील संशयीताला आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी पुण्यातून अटक केली. भुसावळ येथून हा गुन्हा भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतून महिलांनी एकट्यांनी प्रवास करणे चिंताजनक होऊ लागले आहे.

पँट्रीकारमध्ये केला अत्याचार
राजस्थान ढोलपूर येथील एक चौदा वर्षीय मुलगी एकटीच प्रवास करीत होती. भोपाळ रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यावर या मुलीला पॅन्ट्रीकार मधील जेलाम सतनाम सिंग नावाच्या युवकाने पॅन्ट्रीकारमध्येच नेत तेथे त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. झेलम एक्स्प्रेस गाडी भुसावळ स्थानकावर आली असता, ही मुलगी भुसावळ स्थानकावर उतरली. ही मुलगी रेल्वे स्थानकावरील मुुसाफिर खान्यात एकटी बसली असतांना गस्तीवरील आरपीएफ जवांनांनी त्या मुलीची चौकशी केली मात्र, ती घाबरलेली असल्याने ती काही बोलत नव्हती, त्यामुळे महिला पोलिस यांना बोलावून मुलीस धीर दिल्यावर तिने भोपाळ येथील अत्यचाारची घटना सांगितली. यामुळे पोलिस, आरपीएफ सुध्दा चक्रावून गेले. तिच्या सोबत कोणीही नसल्याचे तिने सांगितले. तिचे शिक्षण सातवीपर्यत झाले आहे.



तात्काळ गाडीतील विक्रेत्यांचे घेतले फोटो
अत्याचारग्रस्त मुलीने दिलेल्या माहितीनुसार आणि संशयीताच्या दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी तत्काळ झेलम एक्स्प्रेसमधील पेन्ट्रीकारमध्ये काम करणार्‍यांची माहिती व सर्वांचे फोटो मागविले. आलेले फोटो हे संबंधित अत्याचारग्रस्त मुलीस दाखविले असता, तिने त्यातील ज्या युवकाने अत्याचार केला होता, त्याला ओळखले. त्यामुळे गाडी पुणे स्थानकावर गेल्यावर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तरित्या पॅट्रीकारमधील युवक जेलाम सतपाल सिंग याच्या मुसक्या आवळल्या.

मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
भुसावह लोहमार्ग पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर अत्याचारग्रस्त मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस, महिला पोलिस यांंनी भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपविले. गुन्ह्याचे कागदपत्रे सुध्दा यावेळी भोपाळ जीआरपीकडे सोपविले.भोपाळ येथील लोहमार्ग डीवायएसपी अर्चना शर्मा यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेतली.

संशयीतास घेऊन पोलिस पथक भोपाळकडे रवाना
पुण्यातून अटक केलेल्या जेलाम सतनाम सिंग याला ताब्यात घेण्यासाठी खंडवा जीआरपी पोलिसांचे पथक पुण्यात गेले होते, ते पथक संशयीताला घेऊन रात्रीच भोपाळकडे निघाल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली. संशयीतांला भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपविण्यात येत आहे. असे त्यांनी सांगितले.

यांनी बजावली महत्वाची भूमीका
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफचे निरीक्षक आर.के. मीणा, उपनिरीक्षक मधुकर न्हावकर, सुनील इंळे, विकास पाटील, प्रेम चौधरी, सुरेखा कदम, ज्योती शाहू, सागर खंडारे, अजीत तडवी, जगदीश ठाकूर, दिवाणसिंग राजपूरत, संजीवनी तारगे आदींनी मुलीकडून माहिती काढणे आणि संशयीताचा माग काढण्यासाठी नियोजन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !