शिंदाडच्या शेतकर्‍याचा विजेचा शॉक लागून मृत्यू


Shindad Farmer Dies Due To Electric Shock पाचोरा : पावसामुळे शेतातील वीज खांबात वीज प्रवाह (करंट) उतरल्याने त्याचा धक्का लागल्याने तालुक्यातील शिंदाड येथील शेतकर्‍याचा मृत्यू झाला. संजय दगा पाटील (45) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना बुधवार, 20 रोजी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात गाठले मृत्यूने
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील शेतकरी संजय दगा पाटील (45) हे बुधवार, 20 जुलै रोजी शेतातील कपाशी पिकाला फवारणी करण्यासाठी गेले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास संजय पाटील हे फवारणी करत असतांना शेतात असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी संजय पाटील यांना मृत घोषित केले.


पाचोरा पोलिसात नोंद
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत संजय पाटील यांचे पश्चात्य वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. अतिशय मनमिळाऊ व होतकरू असलेल्या संजय पाटील यांच्या अकस्मात मृत्युने परीसरात शोककळा पसरली.

झेलम एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर पॅन्ट्रीकारमध्ये बलात्कार : आरोपीला पुण्यातून अटक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !