ट्रॅक्टर ट्रॉली लांबवली : भामटा पोलिसांच्या जाळ्यात


Tractor trolley delayed: Bhamta in police net जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली लांबवणार्‍यास अटक केली आहे. इमरान उर्फ फुन्ना खान हयात खान (32, रा. मिठी खाडी, आव्हाणे ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शिरसोली परीसरातून ट्रॅक्टरची ट्रॉली
शिरसोली प्र.बो. येथील निजामोद्दीन शमाशोद्दीन पिंजारी यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली 24 जानेवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पोलिसांनी सागर उर्फ गोल्या रमेश मोरे व आकाश ज्ञानेश्वर शिंदे (दोन्ही रा. आव्हाणे) याला यापुर्वी अटक करण्यात आली होती. पण, त्यांचा साथीदार इमरान उर्फ फुन्ना खान हयात खान हा मात्र पसार होता.


गोपनीय माहितीवरून अटक
संशयीत इम्रान खान जळगाव शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मुदस्सर काझी यांना आज बुधवार, 20 जुलै रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, मुदस्सर काझी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी इमरान याला सापळा रचून अटक केली.

शिंदाडच्या शेतकर्‍याचा विजेचा शॉक लागून मृत्यू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !