Phulgaon Andolan फुलगावजवळील अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे रास्ता रोको आंदोलन

महामार्ग ठप्प : आंदोलनाने महामार्ग प्रशासनाची उडाली तारांबळ : प्रकल्प संचालकांनी दिले कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन


Yuva Swabhiman Party’s Rasta Roko Andolan for completion of unfinished works near Phulgaon
भुसावळ :
फुलगाव येथील ओव्हर ब्रिज जवळील (चॅनल क्र.391) राष्ट्रीय महामार्ग क्र.06 वरील तसेच सर्विस रोडवरील अर्धवट स्वरूपाच्या कामांच्या निषेधार्थ लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, 21 जुलै रोजी रास्ता रोको सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आंदोलन करताच दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील व सहकार्‍यांनी व आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांची चिखली-तरसोद महामार्गाचे काम पाहणार्‍या अभियंत्यांनी भेट घेवून प्रकल्प संचालकांचे काम पूर्ण करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या नेमके दर

या कामांसाठी रास्ता रोको आंदोलन
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र.06 विभागांतर्गत येणार्‍या रस्त्याची , सर्विस रस्त्याचे ब्रिज, गटारी विशेषतः 319 चॅनेल क्रमांक जवळील लाईट, मोठे हॅलोजन, बस स्टॅन्ड, गतिरोधक ही कामे अपूर्ण असल्याने पूर्ण करण्यात यावेत, त्याचप्रमाणे अंडर बायपासमध्ये पाणी साचल्याने व पूल अरुंद असल्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनधारक व नागरीकांचे प्रचंड मानसिक, शारीरीक हाल होत असल्याने त्याबाबत दखल घेण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.



महामार्ग प्रशासनातर्फे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन
गुरुवारी सकाळी 11 वाजता फुलगाव येथील जोगेश्वरी हॉटेल जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नहींचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी चिखली-तरसोद महामार्गाचे काम पाहणारे वरीष्ठ अभियंता शैलेंद्र आवारे व अभियंता रुपेश गायकवाड यांना पाठवत किरकोळ कामे पूर्ण करण्याबाबत लेखी पत्र दिले. ड्रेनेजचे काम पूर्ण करण्यासह ड्रेनेज साफ करण्याचे तसेच रस्त्यावर गतिरोधक लावण्याचे व अन्य छोट्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले.

यांचा आंदोलनात सहभाग
युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, ज्येष्ठ नागरिक ओंकार सोनार, प्रल्हाद जाधव, नारायण लोणे, ज्योती पाटील, दीपक चौधरी, अक्षय शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश चौधरी, रीटा खरताडे, सुनीता जवरे, विजया विलास पाटील, सुनीता गजानन चव्हाण हे उपस्थित होते.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ईडी कार्यालयात हजर ; काँग्रेसचे देशभर आंदोलन





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !