विहित करारापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन : भुसावळ तहसीलदारांनी आयुष प्रोकॉन कंपनीला सुनावला 75 लाखांचा दंड


Minor Mineral Extraction Beyond The Prescribed Contract : Bhusawal Tahasildar Fines Ayush Procon Company 75 lakhs भुसावळ : चिखली-तरसोद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामातील सुमारे 50 किलोमीटरच्या कामाचे उपकंत्राट हे आयुष प्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाल्यानंतर विहित करारापेक्षा अधिक गौण खनिजाचा उपसा करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर भुसावळ तहसीलदारांनी संबंधित कंपनीला 75 लाख, 56 हजार 280 रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तीन दिवसांमध्ये भरण्याचे निर्देशदेखील देण्यात आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाचे पाच लाखांचे दागिने लांबवले

तक्रारीनंतर तहसीलदारांची कारवाई
चिखली ते तरसोद या महामार्गातील टोल नाका असणार्‍या टप्प्याचे बांधकाम करणार्‍या आयुष प्रोकॉन कंपनीला तहसीलदारांनी तब्बल 75 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. गौणखनिजाचा बेसुमार उपसा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. वाघूर नदीच्या काठावर असणार्‍या तिघ्रे गावाच्या परीसरात सदर कंपनीने आपले युनिट उभारले आहे. या हायवेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनिज लागते. यासाठी कंपनीने भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण येथील एका शेतातून दगड, माती, मुरूम आदी काढण्यासाठीचा करार केला होता. मात्र विहीत करारापेक्षा यातून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.


तहसीलदारांच्या कारवाईने खळबळ
भुसावळचे तहसीलदार दीपक धीवरे यांनी या तक्रारीवरून चौकशी करून यात आयुष प्रोकॉन कंपनीचा चूक असल्याचा ठपका ठेवत कंपनीला तब्बल 75 लाख, 56 हजार 280 रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तीन दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.

नशिराबाद टोल नव्हे झोल प्लाझा : बोगस मशिनींद्वारे वाहनधारकांना दररोज लाखोंचा गंडा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !