सोयीच्या बदलीसाठी मिळवले अपंगत्वाचे बनावट दाखले : रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर गुन्हा


Gram sevak Appa obtained fake disability certificates for convenience transfer : Crimes against six persons रावेर : सोयीच्या बदलीसाठी अपंगत्वाचे बनावट दाखवले मिळवल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नशिराबाद टोल नव्हे झोल प्लाझा : बोगस मशिनींद्वारे वाहनधारकांना दररोज लाखोंचा गंडा

बनावट दाखल्यांच्या तक्रारीची दखल
तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामसेवक शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्र कुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.


न्यायालयाच्या आदेशाने उडाली खळबळ
याप्रकरणी निंबोल येथील किशोर भिवा तायडे यांनी जिल्हा परीषद, पंचायत समितीकडे तक्रार केली होती मात्र त्याची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन न्यायाधीश अनंत बाजड यांनी सदर सहाही ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात फिर्यादींच्या वतीने अ‍ॅड.कुणाल गवई यांनी काम पहिले.

हृदय शस्त्रक्रिया दर्शवून घेतला बदलीचा लाभ
या प्रकरणी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात शिवाजी सोनवणे यांची अँजिओप्लास्टी झालेली असताना त्यांनी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला आहे तर उर्वरीत पाच जणांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने दिलेला आहे.

पुरी-अजमेर एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाचे पाच लाखांचे दागिने लांबवले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !