मुक्ताईनगरात नगरसेविका पूत्राची भरचौकात धुलाई : तरुणीचे फोटो व्हायरल करणे अंगलट


Muktainagar Chopale For Viralizing Young Girl’s Photos मुक्ताईनगर : पर्यटनास गेलेल्या तरुणीचा फोटो एका ग्रुपमध्ये चुकून गेल्यानंतर या फोटोला वेगळा संदर्भ देवून व्हायरल केल्याप्रकरणी मुक्ताईनगरातील नगरसेविका पूत्र आमीन खान अहमद खान याची माय-लेकींनी शहरातील भर चौकात चांगलीच धुलाई केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकारानंतर मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात या तरुणाला देण्यात आले.

सोशल मिडीयावर धुलाईचा व्हिडिओ व्हायरल
शहरातील तरुणी सहलीला गेल्यानंतर तिच्याकडून पर्सनल फोटो एका ग्रुपमध्ये सेंड झाले होते व त्यानंतर संबंधित फोटो नजरचुकीने सेंड झाल्याचा मेसेज टाकण्यात आला व चुकीचे कमेंटस कुणीही टाकू नये, असा संदेशही टाकण्यात आला मात्र सदरील फोटे संशयीत आरोपी आमीन खान पर्यंत पोहोचल्यानंतर त्याने त्या फोटोखाली चुकीचे फोटो टाकून कमेंटस केली होती. या प्रकरणी तरुणाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.


तरुण दिसताच भर चौकात धुलाई
तरुणीच्या फोटोला चुकीचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर वायरल केल्याचा संतापातून महिलेसह तरुणीला नगरसेविका पुत्रास शुक्रवारी दुपारच्या सुमारास चोप दिल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. संशयीत हा नगरसेविकेचा मुलगा असल्याने याला लाज वाटली पाहिजे, असे त्या तरुणीच्या आईने सांगत संताप व्यक्त केला. आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बिग ब्रेकींग : उच्च न्यायालयाचे आदेश येताच मुक्ताईनगरात नगराध्यक्ष निवडीला स्थगिती


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !