रीक्षा चालकाला मारहाण : पाच जणांविरोधात गुन्हा


बघतोस काय रागाने म्हणत रीक्षा चालकाला जळगावात चोपले

Assault on rickshaw driver: Crime against five persons जळगाव : माझ्याकडे का बघतो या किरकोळ कारणातून रीक्षा चालक युवकाला पाच जणांनी लोखंडी कैचीने वार करून दुखापत केली. ही घटना शहरातील रेल्वेस्थानक परीसरात घडली. या प्रकरणी गुरूवार, 21 जुलै रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


किरकोळ कारणावरून मारहाण
मोनल विजय रतवेकर (27, रा. गेंदालाल मिल, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रीक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार, 21 जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनच्या आवारात उभा असतांना एहसान अली हैदर अली हा जवळ येवून माझ्याकडे का बघतो असे सांगून मारहाण केली. त्याच्या सोबत असलेले हैदर अली बालम अली, शरेखान बालम अली, अरबाज शेख रा. उस्मानिय पार्क आणि एक अनोळखी या पाच जणांनी देखील मारहाण केली. यातील अरबाज शेख याने हातातील लोखंडी कैची घेवून मोनल रतवेकर याच्या डोक्यावर वार केले तर एकाने हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत मोनल हा गंभीर जखमी झाला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
मोनल रतवेकर यांच्या फिर्यादीवरून दुपारी शहर पोलिस ठाण्यात एहसान अली हैदर अली, हैदर अली बालम अली, शेरखान बालम अली, अरबाज शेख रा. उस्मानिय पार्क आणि एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

मुक्ताईनगरात नगरसेविका पूत्राची भरचौकात धुलाई : तरुणीचे फोटो व्हायरल करणे अंगलट


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !