Eknathrav Khadse माजी मंत्री खडसे म्हणाले : मुक्ताईनगरात हप्तेखोर पोलिसांच्या आशीर्वादाने गुंडगिरी वाढली


Former minister Eknathrav Khadse said : Hooliganism has increased in Muktainagar with the blessing of confiscating police मुक्ताईनगर : तरुणीचा फोटो सोशल मिडीयात व्हायरल केल्यानंतर नगरसेविका पूत्राला मारहाण झाल्यानंतर मुक्ताईनगरात राजकीय वातावरण तापले आहे. मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करीत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हप्तेखोर पोलिसांमुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून 307 च्या गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट फिरत असून अवैध धंदेदेखील वाढले असून या बाबत खंडपीठात याचिका दाखल करू, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.

अत्याचार प्रकरण : सोयगाव तालुक्यातील संशयीत पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे गुन्हेगारी वाढली
मुक्ताईनगरात पोलिसांमुळे गुंडागर्दी वाढली असून लाचार आणि हप्तेखोर पोलिसांमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहे, या गुंडांचे अवैध धंदे असल्याने आणि ते पोलिसांना हप्ते देत असल्याने या गुंडावर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप खडसे यांनी केला. एका तरुणीने सोशल मिडीयात चुकून फोटो टाकल्यानंतर तो फॉरवर्ड केल्याच्या रागाने महिलेसह तरुणीने नगरसेविकेच्या पुत्राला शुक्रवारी मारहाण केली होती.


नगराध्यक्षपद निवडणूक स्थगितीच्या रागातून कार्यकर्त्याला मारहाण
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, आज मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली. त्याच्याच रागातून आज माझ्या कार्यकर्त्याला महिलेसह जमावाने मारहाण केली. मुक्ताईनगरात संबंधित गुंडांकडून नेहमी अशाच प्रकारच्या घटना घडत असून या गुंडांवर कठोर कारवाईसाठी लवकरच औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल करणार असल्याचेही यावेळी खडसे यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई करणार : जिल्हा पोलिस अधीक्षक
दरम्यान, मुक्ताईनगर येथील नगरसेविका पुत्रास मारहाण केल्या प्रकरणी पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

मुक्ताईनगरात नगरसेविका पूत्राची भरचौकात धुलाई : तरुणीचे फोटो व्हायरल करणे अंगलट


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !