आषाढी देव दर्शनानंतर संत दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी !

टाळ मृदंगाच्या गजरात दुम दुमली अवघी मुक्ताईनगरी


After Darshan of Ashadhi God, devotees gather for Saint Darshan! मुक्ताईनगर : आषाढी कामिका एकादशीला आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो पायी दिंड्यानी श्री क्षेत्र मुक्ताईनगर व कोथळीस्थित नवीन व जुन्या मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात रविवारी हजेरी लावली. आषाढी एकादशीला पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी घराकडे परतल्यानंतर आपापल्या परीसरातील संत दर्शन घेण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार खान्देश, विदर्भ व मध्यप्रदेशातील लाखो भाविकांनी रविवारी तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे येवून आदिशक्ती संत मुक्ताई दर्शन घेतले. यावेळी शहरातील रस्त्यावर व मंदिर परिसरात दिंडी सोहळ्याच्या पवित्र टाळ, मृदुंग व नाम घोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मीचा क्षीण गेला ॥1॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रा ॥
सकळही कुळ पवित्रा । याचिया दर्शने होती ॥


हजारो भाविकांनी घेतले दर्शन
जुन्या कोथळीतील आदिशक्ती मुक्ताईचे समाधीस्थळ मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम रखडलेले आहे. दर्शन बारीसाठी अपूर्णावस्थेत असलेल्या बांधकामातून सकाळपासून भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती वाढल्याने दर्शन बारी लावण्यात आली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिशक्ती संत मुक्ताईचे जुनी कोथळी येथे दर्शन घेतले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यात्रेस्वरुपातील गर्दीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली 20 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.
फराळ, दराबा व खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती.

शनीपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकले दुचाकी चोरटे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !