धुळ्यात ट्रॅव्हलमधून सव्वा पाच लाखांचा गुटखा जप्त


धुळे : मोहाडी पोलिसांनी ट्रॅव्हलमधून सव्वा पाच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. 20 लाखांची ट्रॅव्हल्स आणि गुटखा असा एकुण 25 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई लळींग टोल नाक्यावर (एम.पी.07 पी.5090) क्रमांकाच्या अशोक ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. त्यात पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा साठा मिळून आला. त्यांची किंमत 5 लाख 29 हजार 680 रूपये इतकी आहे. या गुटख्यासह 20 लाखांची ट्रॅव्हल्स असा 25 लाख 29 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. चालक जयप्रकाश रमेश पाटीदार ( 34 रा. आदर्श नगर, इंदूर), सहचालक अरूण शिवनाथ यादव (46 रा. किरोद करताल पुराण बस्ती, तेजाजी नगर, इंदूर) व हकीम खान नबीनुर खान (वय 29 रा. ग्राम बाबंदा, ता.कचराव, जि. खरगोन) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !