कांचन नगरातील 20 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या
A 20-year-old youth from Kanchan Nagar committed suicide by hanging himself जळगाव : कांचन नगरातील 20 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . रीतेश उर्फ पांडू मधुकर सपकाळे (20, कांचन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ; शेतकरी पूरस्थितीत त्रस्त असताना मुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त
घरी कुणी नसताना केली आत्महत्या
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रीतेश सपकाळे हा आई मंगलाबाई, मोठा भाऊ पंकज यांच्यासोबत वास्तव्याला होता. रीतेश हा मिळेल ते काम करून गुजराण करीत होता. रविवार, 24 जुलै रोजी आई बाहेर कामानिमित्त तर मोठा भाऊ पंकज हा महापालिकेत कंत्राटी पध्दतीने कामावर गेला असताना रीतेशने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसताना साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणार्यांच्या लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

शनीपेठ पोलिसांची धाव
शनीपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत सैंदाणे यांची घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रीतेशच्या पश्चात आई, भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.