नंदगावात शेत रस्त्याच्या वादातून एकास जातीवाचक शिविगाळ : 133 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा
In Nandgaon, a casteist was insulted by a dispute over a farm road: a case against a mob of 133 people जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे शेत रस्त्याचा वाद उफाळल्याने एकास धमकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तब्बल 133 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ; शेतकरी पूरस्थितीत त्रस्त असताना मुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त
रस्ता खोदल्याने तरुणाला जातीवाचक शिविगाळ
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे शेताकडे जाण्याचा रस्ता खोदल्याने तरुणाला शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गेल्या महिन्यात 13 जून रोजी घडली होती. यात प्रदीप दिलीप सोनवणे यांना ट्रॅक्टरवरून धिंड काढण्याची धमकी देत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना मारण्याचीही धमकी देण्यात आली होती.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
या प्रकरणी प्रदीप दिलीप सोनवणे यांनी शनिवार, 23 जुलै रोजी तालुका पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार तालुका पोलिसात 133 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रभान कौतीक सोनवणे, सतीश बाबुराव धनगर, कल्पना चंद्रभान सोनवणे, सुरेखा प्रवीण धनगर यांच्यासह गावातील 133 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.