Murder Shook Malegaon खुनाने मालेगाव हादरले : तलवारीचे वार करीत तरुणाचा वादातून खून


Murder Shook Malegaon : A young Man Was Killed in a Dispute With A Sword मालेगाव : शहरातील सलीम मुन्शीनगर भागात रविवारी रात्री गुंडांच्या टोळीने दोन भावांवर तलवारीने हल्ला केल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहंमद इब्राहिम समसुद्दोहा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर या हल्ल्यात त्याचा लहान भाऊ अब्दुल अजीज समसुद्दोहा हा गंभीर जखमी झाला आहे.

आझाद नगर पोलिसात गुन्हा
तरुणाच्या खून प्रकरणी आझादनगर पोलिसात अब्दुल आहद मोहंमद इसाक ऊर्फ हमीद लेंडी (36, रा. सलीम मुन्शीनगर) यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी अफजल खान गुलशेर खान, कासीम (पूर्ण नाव माहीत नाही) असलम खान गुलशेर खान, जफर उल्ला खान अमन उल्ला खान ऊर्फ पहिलवान, वसीम भांजा (सर्व रा. मालेगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.


मालेगावात गुंडगिरी वाढली
शहरात काही महिन्यांपासून गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सतत होणार्‍या हल्ल्याच्या घटनांमुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

भुसावळातील तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू

जुन्या वादातून केला तरुणाचा खून
संशयीत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडी दांडके घेऊन मोहंमद इब्राहिम समसुद्दोहा यासोबत झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून त्यास मारहाण केली. संशयीत आरोपी अफजल व कासीफ याने तलवारीने आणि असलम याने लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. इब्राहिम यास सोडविण्यासाठी त्याचा लहान भाऊ अब्दुल अजीज समसुद्दोहा हा आला असता त्यालादेखील संशयीत आरोपी नासीरने लाकडी दांडक्याने, तसेच जफा पहिलवान आणि वसीम भांजा या दोन संशयीत आरोपींनी तलवारीने मारून गंभीर जखमी केले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहंमद इब्राहिम यास उपचारार्थ सामान्य रुग्णालय आणि तेथून खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी करत आहेत.

जळगावातील रीक्षा चालक तरुणाचा खून : आरोपीला पोलिस कोठडीची हवा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !