Misappropriation of one And a Half Cores In Toilet Scheme : Accused Sent To Police Custody शौचालय योजनेत दिड कोटींचा अपहार : आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
Misappropriation of one And a Half Cores In Toilet Scheme : Accused Sent To Police Custody
रावेर : वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या दिड कोटींच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर 12 आरोपींना रावेर पोलिसांनी अटक केली होती. त्यात आजी-माजी अधिकार्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
रावेर न्यायालयाने सहा गटविकास अधिकारी दीपक संदानशीव, ग्रामपंचायतीचे तत्कालीन विस्तार अधिकारी दिनकर सोनवणे यांना न्यायालयाने पुन्हा 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अन्य दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने संशयीतांना जळगाव कारागृहात रवाना करण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.