खिरोद्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण : अज्ञाताविरोधात गुन्हा


Abduction Of Minor Girl From Khiroda : Crime Against Unknown सावदा : अज्ञाताने रावेर तालुक्यातील खिरोदा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण करीत पळवून नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील रीक्षा चालक तरुणाचा खून : आरोपीला पोलिस कोठडीची हवा

सावदा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा
रावेर तालुक्यातील खिरोदा येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 23 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केले. पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही आढळून न आल्याने अखेर रविवारी 24 जुलै रोजी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहे.


खुनाने मालेगाव हादरले : तलवारीचे वार करीत तरुणाचा वादातून खून 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !