निकृष्ट कामामुळे रावेर न.पा.च्या नवीन इमारतीची भिंत पडली
दोषी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी : कामाच्या दर्ज्यावर प्रश्नचिन्ह
The wall of the new building of Raver N.P. fell down due to shoddy work रावेर : सुमारे दोन कोटी 46 लाख रुपये खर्चून येथील नगरपालिकेच्या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू आहे मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच या इमारतीच्या मागील भागाची पूर्ण भिंत कोसळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत निकृष्ट बांधकामाची तक्रार नागरीकांनी केल्यावरही मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांनी दखल घेतली नसल्याचा नागरीकांचा आरोप आहे तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
जिल्हाधिकार्यांनी घ्यावी दखल
रावेर नगरपालिकेच्या इमारतीच्या जागेवर नव्याने इमारतीचे बांधकाम सुरू आहे मात्र या इमारतीची मागील भागाची पूर्ण भिंत रविवारी रात्री कोसळल्याने शहरात पालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांच्या दर्जाचा प्रश्न चर्चेत आला आहे. जुन्या इमारतींच्या जागेवर चावडीजवळ बांधकाम होणार्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाबाबत शेख गयासुद्दीन काझी यांनी 31 जानेवारी 2022 तसेच 16 फेब्रुवारी व 23 फेब्रुवारीला मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. इमारतीच्या बांधकामासाठी ठेकेदाराने अनधिकृतरीत्या विजेचा वापर केला असल्याचा तक्रारीत उल्लेख होता मात्र त्याबाबत दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.



कामापूर्वीच कोसळली भिंत
रविवारी मध्यरात्री या इमारतीची इमारत पूर्ण होण्यापूर्वीच भिंत कोसळली आहे. इमारतीच्या बांधकामाची उच्चस्तरीय समिती नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी शेख गयासुद्दीन काझी यांनी केली आहे. संबधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नारिीकांतर्फे करण्यात आली आहे. निकृष्ट बांधकाम होत असल्याबद्दल काझी यांनी याच संदर्भात 1 जुलैला वकिलामार्फत मुख्याधिकार्यांना नोटीस पाठवली आहे मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.